पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
कोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या काळात स्वस्त धान्य दुकानातून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील राष्ट्रीय सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय कुटुंबांना पाच किलो तांदूळ मोफत मिळत आहे आता हरभरा व तुर यापैकी कोणतीही एक डाळ मोफत मिळणार असल्यामुळे गरिबांसाठी ही बाब दिलासा देणारी नक्कीच आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात डाळीच्या वितरणाची मे महिन्या साठी जेमतेम पूर्वतयारी झाली आहे. असे पत्र जिल्हा पुरवठा विभागाने तहसीलदारांना दिले आहे. त्यामुळे विशेष म्हणजे या वितरणामध्ये काही तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे गरिबांची मोठे हाल होत आहे. यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यासाठी प्रतिमहिना प्रत्येकी लाभार्थ्यांना पाच किलो मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका एक किलो तूर किंवा हरभरा या दोन पैकी एका डाळीचे मोफत वितरण करण्यात येणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत डाळीचा साठा मंजूर करण्यात आला आहे. असे पत्र जिल्हा पुरवठा विभागाने संबंधित तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकार्यांना पाठविले आहे. मात्र अद्याप राशन दुकानात डाळ पोहोचली नसल्याचे तालुका अन्न पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार बी.बी.पपुलवार यांनी सांगितले आहे. तसेच संबंधित स्वस्त धान्य दुकानांमध्ये लवकरच डाळींचा साठा उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक कुटुंबाला मिळणार मोफत एक किलो डाळ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक व अंत्योदय अन्न योजना अंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारक लाभार्थी कुटुंबांना एक किलो प्रमाणे मोफत डाळीचे वितरण करण्यात येणार आहे.
-जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये
Leave a comment