फर्दापूर पोलिसांची कारवाई
फर्दापूर । वार्ताहर
अवैधरीत्या देशी दारुची तस्करी करणार्या आरोपीच्या ताब्यातून देशी दारूच्या 30 बाटल्या जप्त करुन आरोपी विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एपीआय प्रतापसिंह बहूरे यांच्या नेतृत्वाखाली पो.कॉ दिपक सोनवणे,धनराज खाकरे,प्रविण गवई,आर.के म्हस्के यांच्या पथकाने फर्दापूर येथील तोंडापूर फाट्या जवळील औरंगाबाद-जळगाव महामार्गावर केली आहे.
या बाबत पोलिस सुत्रांकडून प्राप्त अधिकृत वृत्त असे की शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगावकडून औरंगाबादच्या दिशेने एक तरूण हातात पिशवी घेऊन पायी जात असल्याचे महामार्गावर गस्त घालत असलेल्या फर्दापूर पोलिस ठाण्याच्या पथकाच्या निदर्शनास आले दरम्यान पोलिसांची गाडी दिसताच सदरील तरुणांने संशयास्पद रित्या हालचाल करण्यास सुरुवात केली ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसांनी सदरील तरुणाला थांबवून विचारपूस केली असता त्या तरुणांने त्याचे नाव भूषण शेकोबा वाघ(वय 23 रा.शिवना ता.सिल्लोड) असे सांगून उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली यामुळे पोलिसांचा संशय बळावून त्यांनी भूषण जवळील पिशवी तपासली असता त्यात देशी दारूच्या टँगो पंच नावाच्या 1 हजार पाचशे रुपये किमंतीच्या 30 बाटल्या मिळून आल्या दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करून आरोपी भूषण शेकोबा वाघ विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Leave a comment