सोयगाव । वार्ताहर
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणार्या नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहेत.अनेक लोकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अश्या परिस्थितीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघात मा.ना.अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम हाती घेऊन गरीब व गरजू कुटुंबांना आधार देण्याचे कार्य शिवसेनेतर्फे हाती घेण्यात आले आहे. आज सोयगाव तालुक्यातील गरीब व गरजू कुटुंबांना महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप करण्यास सुरवात करण्यात आली आहे,यापूर्वी देखील मतदारसंघात मोफत मास्क व साबण वाटप,दररोज 1000 गरजूंना घरपोच जेवण,किराणा व जीवनावश्यक वस्तू वाटप,दूध वाटप अशे अनेक उपक्रम शिवसेने तर्फे घेण्यात आले आहे.
गुरुवार दि.14 रोजी सोयगांव तालुक्यातील गावामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन करून ही मदत वाटण्यात आली. याप्रसंगी प्रभाकरराव(आबा) काळे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे,शहर प्रमुख गजानन चौधरी, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, धरमसिंग चव्हाण,दिपक बागुल, सलीम पठाण, इलियास चाचा, सरपंच जुबेदाबी तडवी, मंगेश पाटील, सरपंच राजमल पवार, डॉ.देशमुख, आत्माराम पवार, सांडू राठोड, यशवंत जाधव, भरत राठोड, प्रताप राठोड, सरपंच समाधान तायडे, श्रीराम चौधरी, ध्रुपता ताई, शेख मुक्तार, कुणाल राजपूत, बाबू चव्हाण, श्रावण चव्हाण, हिरा राठोड, श्रावण जाधव, सुपडू पाटील, नईम पठाण, शफीक पठाण, नामदेव सोंने, मनोज शेवगण, रवि शेवगण, संजय डोभाळ, राधेश्याम जाधव, गणेश राठोड, सुरेश चव्हाण, हिरा चव्हाण, मदन राठोड, पंडित राठोड, सांडू तडवी, दिलीप जाधव, भास्कर सोनवणे, काशीनाथ मुळे, दिलीप देसाई, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.
Leave a comment