रुग्णांना कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती
जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना । वार्ताहर
मालेगाव येथुन परतलेल्या व भोकरदन येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या चार जवानांचा, शहरातील एका खासगी दवाखान्यातील 48 वर्षीय डॉक्टर, 28 वर्षीय प्रशासकीय अधिकारी तसेच मुंबई येथुन परतलेल्या व मंठा येथील कोव्हीड सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या 26 वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल दि. 15 मे रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाला असुन सर्वांना कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण 1691 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 33 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 863 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 15 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1366 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -07 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 25 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1322, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 257, एकुण प्रलंबित नमुने -15 तर एकुण 830 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या - 51, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 692 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-13, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -442, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-19, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -33, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -26, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 357 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 136 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 4 हजार 386 असे एकुण 4 हजार 522 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-4441, बिहार-3009, मध्यप्रदेश-1026,राजस्थान-658, पश्चिमबंगाल-481, झारखंड-425, यासह उर्वरित 16 राज्यातील एकुण 11076 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 5704 अशा एकुण 16780 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार-128, आंध्रप्रदेश-103, ओरिसा-113,मध्यप्रदेश-739,छत्ती
Leave a comment