जालना । वार्ताहर
पत्रकारांच्या मूलभूत हक्क संरक्षणासाठी जालना प्रेस क्लब बर्याच वर्षापासून कार्यरत असून या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले गेले आहेत यापुढे पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ही संघटना कार्यरत असून या संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी भरत मानकर तर सचिव पदी विष्णू कदम यांची निवड करण्यात आली आहे. जालना प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष अविनाश कव्हळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विजय कॉम्प्लेक्स, भोकरदन नाका येथे नुतन अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीसाठी आज दि. 15 मे शुक्रवार रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार अंकुशआप्पा देशमुख, मकरंद जहागीरदार, पारस नंद यादव, अर्पण गोयल, अशिष रसाळ, संतोष भुतेकर यांची उपस्थिती होती. जालना प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेती, शेती पूरक व्यवसाय, पाणीप्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्काच्या बाबत ग्रामीण भागातील व शहरी भागातील विविध समस्यांवर लिखाण करून प्रश्न मार्गी लावणे, ग्रामीण व शहरी पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर आयोजीत करून पत्रकारांवर होणार्या अन्याय विरुद्ध आवाज उठवण्या संदर्भात युवक पत्रकारांनी पुढे येऊन सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम केले पाहिजे तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सकारात्मक जनजागृती पत्रकारांनी केली पाहीजे असे मत ज्येष्ठ पत्रकार अंकुशआप्पा देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. जालना प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश कव्हळे पाटील, ज्येष्ठ पत्रकार अंकुश आप्पा देशमुख, मकरंद जाहागीरदार, पारसनंद यादव, अर्पण गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना प्रेस क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून भरत मानकर यांची तर सचिव म्हणून विष्णू कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा ङ्गिजिकल सोशल डिस्टनचे पालन करून शाब्दीक आभिनंदन करण्यात आले. राज्यात, देशात कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन, संचारबंदी असल्याकारणाने शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून जालना प्रेस क्लबची बैठक घेण्यात आली. जालना प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भरत मानकर यांनी जिल्हाभरात या संघटनेच्या पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात येणार असून उर्वरित कार्यकारिनी लॉकडाऊन संपल्यानंतर गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a comment