आ.बबनराव लोणीकर यांचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली मागणी
जालना । वार्ताहर
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लोणी सावंगी उच्च पातळी बंधार्यात सीआर मधून पाणी सोडण्याची मागणी माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर यांची एका निवेदना द्वारे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केले आहे.
या निवेदनात असेही म्हटले जालना जिल्ह्यातील परतूर व बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काही भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहिले असून उन्हाच्या वाढत्या पातळीमुळे विहिरींनी तळ गाठला आहे अशा परिस्थितीत लोणी सावंगी उच्च पातळी बंधारा खाली येणारी परतूर तालुक्यातील लोणी, कनकवाडी, गोळेगाव, कुंभारवाडी, चांगतपुरी, संकनपुरी, पिंपळी धामणगाव, सावरगाव, कुंभारवाडी, लांडगदरा यासह माजलगाव तालुक्यातील नाथ्रा, सादोळा, जवळा, आदी गावांमध्ये सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणी सावंगी बंधार्यात पाणी सोडण्यास जनावरांना पिण्याचे पाणी यासह परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. सद्यस्थितीत सदरील गावकर्यांना कोरोना संकटाच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून येत्या काळात पाणी न सोडल्यास या गावांना टँकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. सदरील गावांना पाणी मिळावे म्हणून लोणी सावंगी या उच्च पातळी बंधार्यात पाणी सोडणे गरजेचे आहे, बंधार्यात पाणी सोडण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व तात्काळ पाणी सोडण्याबाबत चे आदेश देण्यात यावे निवेदनात आ.लोणीकर यांनी म्हटले आहे या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेन्द्र फडणवीस विरोधीपक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य,प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी, जालना यांना पाठविल्या आहेत.
Leave a comment