जालना । वार्ताहर
करोना संसर्गाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जालना एज्युकेशन ङ्गाऊंडेशनच्यावतीने इयत्ता दहावी च्या मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोङ्गत शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. इयत्ता नववीच्या वर्गातून दहावीत गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनराईड मोबाईल ङ्गोन मधील झूम अॅप च्या माध्यमातून इंग्रजी, गणित आणि विज्ञान या तिन विषयावर दररोज सकाळी तीन तास शहरातील तज्ञ शिक्षक शिकवणार आहेत.
या ऑनलाईन वर्गात प्रत्येक तासानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील शंका समाधानासाठी विशेष वेळ आरक्षित असेल प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या शंकांचे निरसन करून देण्यात येणार आहे. इयत्ता दहावी च्या वर्गातील अभ्यासक्रमाचे येत्या सप्टेंबर महीना अखेरीस संपूर्ण शैक्षणिक नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार हे सगळे वर्ग चालतील. याच सोबत झालेल्या अभ्यासक्रमावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील आर्थिकद्रष्ट्या कमकुवत गटाच्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. जालना एज्युकेशन ङ्गाऊंडेशनच्या माध्यमातून पढो जालना या अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी चालवण्यात येणार्या शैक्षणिक मोहीमेत हा नवा उपक्रम असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश लाहोटी यांनी दिली आहे. संस्थेच्या वतीने इयत्ता चवथी ते आठवी च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धा घेण्यात येते तसेच देवगिरी किशोरी आणि विद्यार्थी विकास प्रकल्प राबविण्यात येतो आहे करोना संसर्गाच्या साथीच्या लॉकडाऊन काळात याच उपक्रमात सहभागी 150 महीलांना मास्क बनविण्यासाठी प्रशिक्षण आणि त्यानंतर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली विद्यार्थ्यांचे ऑनलाईन तसेच मोबाईल ङ्गोन वरून शैक्षणिक समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे. इयत्ता दहावी च्या मोङ्गत ऑनलाईन शिकवणी वर्गासाठी मोबाईल ङ्गोन नंबर प्रा.सुरेश लाहोटी 7020632526,केन्द्रे 7499277623 संपर्क साधावा अथवा या गुगल लाईन वर उपलब्ध अर्ज दाखल करावा असे आवाहन जालना एज्युकेशन ङ्गाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश लाहोटी यांनी केले आहे.
Leave a comment