गावकर्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
ग्रामीण भागात महिलांसह 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठची शेवटचे गुंज बुद्रुक गाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून कोरोणाच्या संकटाला सामोरे जाऊन गरजूंना त्याची गरज पडल्यास त्यांचा उपयोग व्हावा सामाजिक बांधिलकी म्हणून आपली काही कर्तव्य समजून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच भिमाशंकर धनवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले .यावेळी गावकरी गावातील युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती यानिमित्ताने समस्त गावकर्यांनी च्या वतीने व श्री स्वामी समर्थ ब्लड बँक जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून 40 ते 50 रक्तदात्यांनी रक्तदानासाठी नाव नोंदणी केली होती परंतु प्रकृतीनुसार त्यापैकी 32 जणांनी रक्तदान केले रक्तदान शिबिरास महिलांनी सहभाग नोंदविला होता विशेष म्हणजे येथील औषधी व्यवसायिक बद्रीविशाल जाधव यांनी आपल्या कुटुंबातील बहीण व पत्नीसह रक्तदान केले.
Leave a comment