नगरपंचायतने नळयोजना कार्यान्वित करण्याची मुख्याधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे यांना निवेदन      

बदनापूर । वार्ताहर 

शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील आनंदनगर व सत्यनारायणनगर भागात त्रिवं  पाणी टंचाई जाणवत असून मार्च महिन्यात उन्हाची त्रिवता वाढल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून बोर कोरडे झाल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने या भागात नगर पंचायत ने नळयोजना कार्यान्वित करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांच्याकडे केली आहे.

बदनापूर शहरातील आनंदनगर,सत्यनारायणनगर वस्ती जालना औरंगाबाद महामार्ग रस्त्यावर 2006 मध्ये झाली या वस्तीत जवळपास 50 घरे आहेत मात्र या भागात सार्वजनिक नळयोजना कार्यन्वित झालेली नसल्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरात बोर घेतलेले आहे परंतु सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची पातळी खालावली असून बोर कोरडे झाल्याने नागरिकांनी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे गेल्यावर्षी नगर पंचायत ने या भागात एक बोर घेऊन पाणी व्यवस्था केली होती मात्र यंदा तो बोअर देखील कोरडा पडला आहे नगर पंचायत निवडणुकीत या भागातून निवडणूक लढविणार्‍या नगरसेविकेच्या निवडून येताच सोमठाणा बदनापूर सार्वजनिक नळयोजना मधून पाणी उपलब्ध कौन देण्याचे अश्‍वासन दिले होते मात्र पाच वर्ष उलटले तरी सदर नगरसेविकेच्या या भागात चुकून देखील बघितले नाही आनंदनगर व सत्यनारायण नगर मध्ये जवळपास 50 घरे असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे हाल होत आहे या भागात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जसे महानुभाव आश्रम व एका लोकप्रतिनिधीला नळ योजनेच्या मुख्य पाईपलाईन मधून नळ जोडणी करून देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने या भागात नळ जोडणी करून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांना पुंडलिक घोडके, पडूळ आर.के.भूजल संजय,खडे कैलास,आकाश होरशील सह नागरिकांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.