कुंभार पिंपळगाव । वार्ताहर

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीने ता. 13 बुधवार रोजी सर्वानुमते 14 मे गुरुवार पासून ते 17 मेपर्यंत अत्यावश्यक सेवा दवाखाने व औषधी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ चार दिवस 100 शंभर टक्के लॉकडाऊनचा निर्णयाचा ठराव घेण्यात आला होता .ठरावाची प्रत पोलीस चौकीला देण्यात आली व प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्हाट्सअप ङ्गेसबुक द्वारे सर्व ग्रुप वरून बुधवारीच ग्रामपंचायतकडून  कळविण्यात आले होते. असे सरपंच प्रतिनिधी अन्वर पठाण यांनी सांगितले कुंभार पिंपळगावात काही दुकानदार दुकानाच्या पाठीमागून तर काही दुकानदार समोरून राजरोसपणे ग्राहाकी  करीत असल्याने नुकतेच पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून आलेले कामगार व नोकरदार वर्ग शेतात इतर ठिकाणी राहत असून परिसरातून अनेक जण कॉरांटाईन  केलेले नागरिक कुंभार पिंपळगाव बाजारपेठेत बिनधास्तपणे खरेदीसाठी सर्वकाही  भेटत असल्याने बाजारात दिसून येत असल्याने बाजारपेठेत भितीदायक चर्चा सुरू होती. 

खरेदीसाठी  आठवडाभरापासून बाजारपेठेत गर्दी वाढू लागली त्यामुळे गावकर्‍यांमध्ये भीती वाढली होती . नागरिकांनी ग्रामपंचायतीला कळवले होते .  गावाच्या  हितासाठी योग्य  निर्णय घेतला होता आमच्या आवाहाना झिडकारले आसून काही अरेरावी मुझेगिनो वाल्या व्यावसायिकांनी दुकानात उघडल्या ठेवण्यास सांगितले ...त्याला जबाबदार तेच राहातील ....असे उपसरपंच प्रतिनिधी मनोज गाढे यांनी म्हणटले आहे . खबरदारी म्हणुन  ग्रामपंचायतीने सर्वांच्या वतीने गावातील पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक , व्यापारी पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांच्या  ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहमतीने बाजार पेठ  100% चार दिवस लॉकडाऊन  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यात 80 टक्के प्रतिसादही मिळाला आहे परंतु काही दुकानदारांनी ग्रामपंचायतच्या आदेशाला झुगारून दुकान सरळ-सरळ उघड्या ठेवल्या होत्या यामुळे ग्रामपंचायत व काही दुकानदाराचा  अवमेळ  असल्याचे खेड्यातील नागरिकांनी बोलून दाखविले आहे बाजारपेठेत गर्दी वाढत असल्याने गावकर्‍यांच्या आरोग्याचा प्रश्‍न असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कोरोणाचा एखादा रुग्ण बाजारपेठेत येऊन गेला व कोरोना संसर्ग वाढला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. कोरोनाव्हायरस पसरू नये म्हणून खबरदारी उपाय म्हणुन ग्रामपंचायत ने सर्व स्थरावर उपाययोजना राबवत आहे शासनाच्या आदेशाचे पालन करून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहाण ग्रामपंचायतचे 17 मे पर्यंत 100 टक्के लॉकडाऊनचा ठराव ठाम आहे. ग्रामसेवक विनोद भगत कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायत  जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत . ग्रामपंचायतला शासनाचे आदेश आहेत ग्रामपंचायतला त्यांच्या लेवलवर उपाय योजना करण्याचे अधिकार आहेत .गावांसाठी बंद निर्णय योग्यच आहे. ग्रामपंचायत व व्यापारी संघटना त्यांचा तो प्रश्‍न आहे  सचिन कापुरे पोलीस उपनिरीक्षक कुंभार पिंपळगाव पोलीस चौकी जालना नंतर कुंभार पिंपळगावात कोरोनाचे रूग्ण वाढतील अशी भिती नागरिकांना मध्ये वाटत असल्याने कुंभार पिंपळगावात ग्रामपंचायत ने 4 दिवस 100 % लॉकडाऊनचा अत्यंत आवश्यक सेवा दवाखाने व औषधी दुकाने वगळता ठराव घेऊन पो.उप नि.यांना देऊन सर्वांना कळवण्यात आले आहे. काही व्यापारी सहकार्य करत नाहीत..योग्य वेळ आल्यास ग्रापंचायत ठरविलं गावचे काहीतरी  अधिकार ग्रामपंचायतलाही  असतात.. उपसरपंच रेखा गाढे कुं.पिंपळगाव ग्रामपंचायत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.