पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायतने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोणा ग्राम निर्मूलन समितीची स्थापन केली आहे. तसेच बाहेरून येणार्या जाणार्या वर नजर ठेवून त्यांना व्कारंटाईन करण्याच्या प्रयत्नात कोरोणा ग्राम निर्मुलण समिती सध्यातरी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
येथील ग्रामपंचायतीने कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना ग्राम निर्मूलन संघर्ष समिती गठीत करून बाहेरून गावात येणार्या नवीन लोकांवर गाव बंदिची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवली होती, त्यानुसार सदस्य आपआपले कार्य करीत होते गावात एखादा नवीन व्यक्ती आला तर त्याची माहिती देण्याची जबाबदारी त्या कुटुंबातील प्रमुखावर सोपवली आहे .असे असताना मात्र त्यांच्याकडून अशी माहिती देणे टाळले जात असल्याची चर्चा आहे.त्यामुळे गावबंदीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पोलीस प्रशासना सोबतच आरोग्य विभागातील कर्मचारी सुद्धा याप्रकरणी सजग आहेत. कोरोणा विषाणुची कशाप्रकारे लागण होऊ शकते याबाबत अनेक गंभीर परिणामासह जनजागृती केली जात होती. मात्र आता याकडे दुर्लक्ष होत आहे. लॉक डाऊन आणि संचारबंदी कालावधीत सुद्धा बाहेरून येणारे गावात येऊन मुक्तपणे ङ्गिरतांना लोक आढळुन येत आहे. यावरून कोरोना निर्मूलन संघर्ष समिती हतबल झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
Leave a comment