औरंगाबाद | वार्ताहर
औरंगाबाद शहरात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 872 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1)
अन्य (7) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.
घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमान नगर येथील 74 वर्षीय, बायजीपुरा येथील 70 वर्षीय, शहानूर मियाँ येथील 57 वर्षीय आणि हिमायत नगर येथील 40 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment