रयतशेतकरी संघटनेचे पैठणतालुका अध्यक्ष आदित्य वने यांचा इशारा

विहामाडंवा । वार्ताहर

चुकीच्या व अहवालामुळे पैठण तालुक्यातील नऊपैकी दोनच मंडळामधील शेतकरी सण 2019 या वर्षाच्या पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी पात्र ठरले असून उर्वरित सात मंडळातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. एकीकडे अतिवृष्टीने नुकसान झाले तर दुसरीकडे पीकविमा भरुनही लाभ न मिळाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जर चुकीच्या अहवालामुळे शेतकर्‍यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले जात असेल तर शेतकरी कदापि सहन करणार नाही.याची कृषी विभागाने त्वरित दखल घेऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हा कृषिअधीक्षक औरंगाबाद यांना मेलद्वारे करण्यात आली, असून नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा युवा रयत शेतकरी संघटनेचे पैठण तालुकाध्यक्ष आदित्य वने यांनी दिला आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभासाठी सन 2019 च्या खरीप हंगामात तालुक्यातील नऊपैकी  दोनच मंडळातील शेतकरी पात्र ठरले आहे.उर्वरित सात मंडळांना शासनाच्या निकषाचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून या वगळलेल्या मंडळातील शेतकर्‍यांमधून तीव्र असंतोष व्यक्त होऊ लागला आहे.डाळिंब,द्राक्ष,मोसंबी आदी पिकासाठी संपूर्ण तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपल्या वाट्याची विमा संरक्षीत रक्कम बजाज अलायन्स कंपनीकडे भरली होती. सन 2019च्या खरीप हंगामात सप्टेंबरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता. तर त्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची उभी पिके वाया गेली होती.पिक विमा भरलेल्या शेतकर्‍यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ मिळेल या आशेवर शेतकरी बसले होते. संबंधित पर्जनमापक व हवामान मोजमाप यंत्रानेचा आधार घेऊन, विविध निकष लावून हजारो शेतकर्‍यांना विमा संरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा आरोप करण्यात येत आहे.प्रत्यक्षात शेतकर्‍यांचा पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असतांना चुकीच्या अहवालावरून त्यांना वंचित ठेवले जात असेल तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा  युवा रयत शेतकरी संघटनेचे  पैठणतालुकाध्यक्ष आदित्य वने यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिला आहे. त्याचबरोबर विमा कंपनीचा तुघलकी कारभार रोखुन शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.