शिवाजी बॅक ,फोस्टर डेव्हलपमेंटचा उपक्रम
पैठण । वार्ताहर
तालुक्यातील दोन लाख नागरिकांना रोगप्रतिकार औषधी वाटप करून तालुक्याला कोरोना या साथीच्या रोगापासून दुर ठेवण्याचा सामाजिक प्रयत्न करत आहे अशी माहिती शिवाजी नागरी सहकारी बॅकेचे चेअरमन रविंद्र काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फोस्टर डेव्हलपमेंट महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ अनुपमा पाथ्रीकर, डॉ रंजना देशमुख, बॅकेचे व्हाईस चेअरमन हरिपंडित गोसावी, संचालक भाऊसाहेब औटे ,सतिष बलदवा, पाशा धांडे, बॅकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ई आय पठाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी व्ही म्हस्के ,संतोष राऊत, बाळासाहेब दसपुते, स्वाती थोेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जगामध्ये कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातला असून सुदैवाने पैठण तालुक्यात एकही कोरोना बाधीत रूग्ण आढळला नाही .त्यातच तालुक्यातील नागरिकांच्या कुटूंबासाठी शिवाजी नागरी बॅक व फोस्टर डेव्हलपमेंटच्या वतिने आर्सेनिक अल्लबम 30 या होमिओपॅथी औषधीचे वितरण करणार आहोत .या औषधीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मागणी केली आहे .या औषधीमुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होईल व बॅकेच्या वेळेत नागरिकांना हे औषध मोफत उपलब्ध करण्यात येणार असून जास्तच जास्त नागरिकांनी याचा लाभ घेवून तालुका कोरोना मुक्त ठेवावा असे अवाहन देखील रविंद्र काळे यांनी केले
Leave a comment