पाचोड । विजय चिडे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचोड ता.पैठण येथिल डाँक्टरांच्या वतीने कोरोना प्रतिबंधक होमिओपँथी ची औषधचे डाँ.मनोज नाटकर,डाँ.जूबेर पटेल,डाँ.विनोद तवार,डाँ.महेश नरवडे यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करीत वाटप करण्यात आले. कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता पत्रकारांना जे मास्क, सॅनिटायझर आणि होमिओपॅथी कोरोना प्रतिबंध औषध हे निश्चितच कोरोना पासून बचाव करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल कोरोनाच्या महामारीवर प्रतिबंध म्हणून देशासह संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाउन करावे लागले आहे.यासाठी शासन सर्वोत्तपरी प्रयन्त करीत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती गरजूंना मदत करीत आहेत.
आजच्या या महामारी मध्ये पोलीस, डॉक्टर, आणि पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात ताण-तणाव आहे.पत्रकार हा समाज मनाचा आरसा आहे.त्यांच्या मुळेच आपल्याला सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन होते. त्यांना देखील कुटुंब आहे.त्यामुळे त्याची सुरक्षितता सुद्धा तितकीच महत्वाची आहे.म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी होमिओपँथी ची औषधचे वाटप केले आहे. यावेळी पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे,पाचोडचे जेष्ठ पत्रकार हबीबखान पठाण,मुक्तार शेख,इरफान शेख,मुनवर सय्यद,शिवाजी पाचोड,मुरलीधर निर्मळ,विजय चिडे,सिराज सय्यद,सिध्दार्थ वाहूळे,संतोष दळवी,तसेच रंजीत जगताप, पाचोड पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आदी उपस्थिती होते. होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉ. सॅम्युअल हनेमन यांच्या अथक परिश्रमातून ज्या पॅथीची निर्मिती झाली आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सांगण्यानुसार जी पॅथी सर्वात जास्त परिणामकारक आहे.अश्या पॅथीच्या माध्यमातून समाजाप्रती असलेल्या सेवा भावनेतून ह्या औषधाचे वाटप केले आहे...ज्या पोलिसांनी..पत्रकारांनी आमच्या खांद्याला खांदा लावून या लढाईत आम्हाला मोलाची साथ दिली त्यांच्यासाठी आज आपण काहीतरी करावे या शुद्ध भावनेतून आज आर्सिनिक आल्बम 30 या औषधाचे वाटप केलेले आहे. ज्या मुळे या कोविड योध्यांची प्रकृती ठणठणीत राहण्यास आणि कोविड पासून बचाव करण्यास मदत होणार आहे.-डॉ.मनोज नाटकर -पाचोड मातोश्री हॉस्पिटल.
Leave a comment