एकूण 44 हजार 984 रुपयांचा मुद्देमाल जप्त;चौघांन विरूध्द गुन्हा दाखल
फर्दापूर । वार्ताहर
मोटारसायकल वरुन अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करनार्या चौघांन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 9 हजार 984 रुपये किमंतीच्या देशी दारूच्या 192 बाटल्या(चार बॉक्स)व दोन मोटारसायकल असा एकूण 44 हजार 984 रुपय किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई एपीआय प्रतापसिंह बहूरे यांच्या नेतृत्वाखाली फर्दापूर पोलिसांच्या पथकाने दि.14 गुरुवारी औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात केली असून मूनिर बलदार तडवी,कैलास समाधान चौधरी, खाजा बाबू तडवी,आसिफ खुदबुद्दीन तडवी (चौघे रा.पहूरसांगवी ता.जामनेर) असे आरोपींची नावे आहेत या बाबत पोलिस सुत्रांन कडून प्राप्त अधिकृत माहिती अशी की दि.14 गुरुवार रोजी साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांना जामनेर तालूक्यातून चौघेजण मोटारसायकल वरुन अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करीत औरंगाबाद जिल्ह्याच्या दिशेने जात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे
साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे,पो.कॉ नारायण खोडे यांचे पथक औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गस्त घालत असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकल वरुन चार तरुण जळगाव कडून औरंगाबाद च्या दिशेने भरधाव वेगाने जात असल्याचे पोलिसांच्या निर्देशनात आले पोलिसांना तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सदरील तरुणांचा पाठलाग करुन त्यांना अजिंठा घाटात गाठून विचारपूस केल्यानंतर चौघाही तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परिणामी संशयावरून सदरील तरुणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांच्या कडे 9 हजार 984 रुपये किमंतीच्या देशी दारूच्या 192 बाटल्या मिळून आल्या दरम्यान पोलिसांनी आरोपीन कडून मोटारसायकल (क्रमांक एमएच 19 बीबी 6217 व एमएच 19 सीसी 6633)या दोन गाड्यांन सहीत देशी दारुच्या 9 हजार 984 रुपये किमंतीच्या देशी दारूच्या 192 बाटल्या असा एकूण 44 हजार 984 रुपये किमंतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन चौघा आरोपी विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Leave a comment