औरंगाबाद । वार्ताहर
झाल्टा फाटा येथे परराज्यातून अवैधरित्या गुटख्याची तस्करी करणार्या टोळीकडून एक कोटीचा मुद्देमाल सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आला असल्याचे जनसंपर्क अधिकारी ,औरंगाबाद ग्रामिण यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अवैधरित्या गुटख्याची तस्करी करणारा सदरील ट्रक काळ्या रंगाच्या ताडपत्रीने झाकलेला होता व त्यात भाजीपाला भरण्यासाठी वापरण्यात येणार्या प्लास्टीकच्या 255 कॅरेटच्या आडोशात 50 गोणापाटाच्या एकुण 300 गोण्यामध्ये नव्वद लाख रुपये किमतीचा गोवा 1000 गुटखा मिळाला. हा माल सोलापूर येथुन जालना येथे घेऊन जात असल्याचे सदर ट्रकचालकाने सांगितले. पोलीसांद्वारे संबंधितांकडुन गोवा गुटखा,प्लास्टिक कॅरेट,ट्रक व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण एक कोटी तीन लाख पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपय किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांना मुद्देमालासह पुढील कायेदशीर कारवाईसाठी चिकलठाणा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक भागवत फुंदे,पोलीस उपनिरिक्षक संदिप सोळंके,सफी सैय्यद झिया यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वार करण्यात आली असल्याचे जनसंपर्क अधिकारी,औरंगाबाद ग्रामिण यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
Leave a comment