जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना । वार्ताहर
जालना येथील कोव्हीड19 हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेल्या एका 26 वर्षीय महिला डॉक्टरच्या स्वॅबचा अहवाल दि. 14 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली. दि. 12 मे 2020 रोजी आन्वा ता. भोकरदन येथील 20 वर्षीय गरोदर महिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिल्लोड जि.औरंगाबाद या ठिकाणी गेली होती. तेथुन पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद या ठिकाणी पाठविले होते. तेथे त्यांचा स्वॅबचा नमुना घेतला असता तो पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्याअनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हास्तरीय अधिकारी डॉ.श्याम गावंडे व तालुका आरोग्य अधिकारी, भोकरदन डॉ. रघुवीर चंडेल यांनी आन्वा येथे भेट देऊन 245 कुटुंबातील 1248 नागरीकांचे 5 वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य सर्वेक्षण सुरु केले आहे. या पथकात एक वैद्यकीय अधिकारी व दोन पर्यवेक्षकांचा समावेश आहे. संबंधित महिलेच्या संपर्कात एकुण 32 व्यक्ती आले होते. या सर्वांना गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. नागदरवाड यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण 1635 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 20 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 844 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 80 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1349 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 18 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1247, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 254, एकुण प्रलंबित नमुने -80 तर एकुण 824 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-12, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 641 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -431, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-5, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -20, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -00, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 326 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 122 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 3 हजार 723 असे एकुण 3 हजार 845 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार - 119, आंध्रप्रदेश - 103, ओरिसा - 113, मध्यप्रदेश - 710, छत्तीसगड - 08, उत्तर प्रदेश - 2685, झारखंड - 23, राजस्थान - 107, तेलंगणा- 27, हैद्राबाद - 05 असे एकुण 3 हजार 900 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-4409, बिहार-2982,मध्यप्रदेश-1021,रा
Leave a comment