गरजुंना मदत हाच मनी ध्यास-निलेश धस
मंठा । वार्ताहर
साथ रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडुन लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आली आहे.या काळात छावा संघटनेतर्फे गोरगरिब , गरजूंना विविध माध्यमातून सेवा व मदतकार्य करण्याचा संकल्प अविरत सुरू आहे.गरजुंना मदत व सेवा करण्याचा ध्यास मनी धरून तसा संकल्प केल्याचे जिल्हाध्यक्ष निलेस धस यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरात सेवा कार्याच्या माध्यमातुन अन्नदान किट व फळवाटप करण्यात आले. लॉकडाऊन चालू झाल्यापासून आतापर्यंत आम्ही सुमारे दीड हजार गोरगरिबांना जेवण व धान्य गरजूपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी ठरलो असल्याचे छावा श्रमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश धस यांनी सांगितले. याप्रसंगी अन्नदान करतांना छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश धस, उमेश पवार, अजय रणवरे पाटील, नागेश रणवरे, अक्षय जाधव, गणेश लाड आदी उपस्थिती होते.
Leave a comment