लेहा । वार्ताहर
आंतर जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने देशी दारूची दोन ठिकाणी वेगवेगळ्या वाहनाने वाहतुक करणार्या दोनजनांना पारध पोलिसांनी पकडले असून देशी दारू दोन दुचाकी सह 2 लाख 24 हजार 185 रुपयांचा मुद्दे माल पकडला असून दोन जना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या बाबत थोडक्यात माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांना दि 12 रोजी प्राप्त झालेल्या माहिती वरून पोलिस उपनिरिक्षक पी,एस, उबाळे यांनी पोलीस कर्मचार्या ला माहिती देऊन वेगवेगळे दोन गृप तयार करून बुलढाणा जिल्हातील धाड येथिल एका परवाना धारक दुकानातून देशी दारूच्या मालाची चोरटी वाहतुक करणार्या इसमावर नजर ठेवून एक टिममध्ये मौळाई व अवघडराव सांवगी,पिपंळगाव रेणुकाई, येथे पो.उप.नि.पी एस उबाळे, सुरेश पडोळ, ओम नागरे,व होमगार्ड अशे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी थांबलो असता सदर ठिकाणी मोटार सायकलवरून वाहतूक करतांना मोठ्या प्रमाणात देशी दारूचा माल मिळून आला.त्यामध्ये देशी दारूच्या 192 बाटल्या व 04 मोटारसायकल असा एकूण 93,365 रुपये किंमतीचा माल मिळून आला.
तसेच दुसरी टिम वालसावंगी व पदमावती येथे पो हे का सरडे,समाधान वाघ, विकास जाधव. किशोर मोरे,नितेश खरात,असे मिळून बातमीच्या ठिकाणी थांबले असता सदर ठिकाणी मो सा वरून वाहतूक करतांना देशी दारूचा माल मिळून आला,त्यामध्ये देशी दारूच्या 90 बाटल्या व 03 मोटार सायकल असा 65,400.रूपये किमतीचा माल मिळून आला आहे ,असा एकूण 1,58,785 रूपयासह मुद्देमाल मिळून आला असुन तो गुन्हात जप्त करण्यात आला आहे.तसेच सर्व गुन्ह्यात एकूण 12 आरोपी विरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत , सदर गुन्ह्यातील आरोपी हे खुपटा जिल्हा औरंगाबाद ,जनुना ता जिल्हा बुलढाणा,फत्तेपुर,दानापुर,चोरमा
Leave a comment