डॉक्टरांसह आरोग्यपरिचारिकांनी पुष्पवृष्टी करत टाळया वाजवुन दिला निरोप
जालना । वार्ताहर
कोरोना बाधीत होने के बाद हमे यहा लाया गया यहा पे हमारी अच्छी खिदमद की गई.. सबकी की दुआँसे आज सब ठिक हॅु.. यहॉ के डॉक्टर्स, स्टाफ ने हमारी बहोत खिदमद की.. डॉक्टर साहब ने भी हमे हमारा बहोत ख्याल रखा.. अशा भावना कोरोनातून वाचलेल्या व आज जिल्हा सामान्य रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या महिलेने व्यक्त केल्या. जालना जिल्ह्यामध्ये पहिली कोरोनाबाधित आढळलेली दु:खीनगर येथील 65 वर्षीय महिला तसेच पारध ता. भोकरदन येथील तरुणीच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयातुन आज दि. 15 मे, 2020 रोजी डिस्चार्ज देत डॉक्टर व परिचारिकांनी टाळया वाजवुन पुष्पवृष्टी करत दोघींना निरोप देण्यात आला. या महिलांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, डॉ. म्हस्के, डॉ.जगताप, डॉ. सोळंके, डॉ. राठोड, डॉ. सर्वेश पाटील आदींची उपस्थिती होती.
जालना येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी 150 खाटांचे स्वतंत्र अशा कोव्हीड19 रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असुन या दवाखान्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी विविध तज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचनेनुसार आहार तज्ज्ञांच्या सल्ला घेत रुग्णांना दोन वेळेत वरण, भात, भाजी, पोळी याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये मदत करणारे उकडलेले अंडे, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडी, दुध याबरोबरच प्रोटीनचा भरपुर समावेश असलेल्या थ्रेप्टीन बिस्कीटांचाही या रुग्णांच्या आहारामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृती सुधारणा होत आहे. जिल्ह्यातील नगरपंचायत, नगर परिषद तसेच ग्रामपातळीवर अँटीकोरोना पथकाची स्थापना करण्यात आली असुन या पथकाच्या माध्यमातुन परजिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात येणार्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असुन जिल्ह्यात दाखल होणार्या व्यक्तींना होमक्वारंटाईन अथवा गरजेनुसार आयसोलेशन कक्षात भरती करण्यात येत असुन असुन जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण शुन्य टक्के असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
Leave a comment