औरंगाबाद | वार्ताहर
औरंगाबाद येथे कोरोना रुग्णाच्या संख्येत सारखी वाढ होत आहे शहरात आज 74 कोरोनाबाधितांची वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 823 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.,समूह संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्या मुळे काल मध्यरात्री पासून17 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत या आदेशाची कडक अंमलबजावणी
करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत. औरंगाबाद शहरातील
वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरीच रहा सुरक्षित रहा, असे आवाहनही
प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Leave a comment