कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन
औरंगाबाद । वार्ताहर
भरड धान्य (मका / ज्वारी) खरेदी भरड धान्य खरेदी केंद्रांवर 30 जूनपर्यंत केली जाणार आहे. औरंगाबाद तालुक्यासाठी प्रस्तावित केंद्र करमाड येथे आहे. कन्नड, गंगापूर, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, वैजापूर व फुलंब्री या सात तालुक्यासाठी प्रस्तावित केंद्र तालुका मुख्यालयी निश्चित केलेले आहेत. सर्व शेतकरी बाधवांनी भरडधान्य खरेदी केंद्रांवर मका व ज्वारी विक्री करावी. त्याचबरोबर खरेदी, विक्री करताना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी बाबींचे काटेकारपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले केले आहे.
जिल्हयातील आठ तालुक्यात भरड धान्य खरेदी केंद्र चालू करण्याबाबत जिल्हाधिकारी उदय औरंगाबाद यांनी मान्यता दिलेली आहे. शासन निर्णयानुसार राज्यात पणन हंगाम 2019-2020 (रब्बी) मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्याचे (ज्वारी व मका) खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आदेशित केलेले आहे. त्यानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत केंद्र शासनाने ज्वारी (संकरीत) दोन हजार 550/- प्रती क्विंटल, ज्वारी (माल दांडी) रु.2570/- प्रति क्विंटल, बाजरी रु.2000/- प्रति क्विंटल, मका रु. 1760/- प्रति क्विंटल व रागी रु. 3150/- प्रति क्विंटल असे दर निश्चित केलेले आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
Leave a comment