विहामांडवा । अमित पहाडे
पैठण तालुक्यातील विहामांडवा भागात शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक घेन्यास सज्ज झाले आहे. या भागात उन्हाळी बाजरीचे पीक घेताना शेतकरी दिसत आहेत, जून-जुलैपूर्व पावसाळी हंगामात शेतकर्यांनी बाजरीची पेरणी केली होती.
सुरुवातीला पीक चांगले होते, परंतु ऑगस्ट महिन्यात एक ते दीड महिन्यापर्यंत सतत पाऊस पडल्याने पावसाळी बाजरीचे मोठे नुकसान झाले होते. ऑगस्टमध्ये जास्त पाऊस पडला, विहिरींमध्ये व धबधब्यात जास्त काळ पाणी राहिल्याने शेतकर्यांने मार्च महिन्यात ऊन्हाळी बाजरीचे पीकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. अधिकाधिक क्षेत्रात उंन्हाळी बाजरी पिकाची पेरणी केल्याचे दिसून आले. विहिरिला पाणी जास्त भरपूर असल्यामुळे बाजरीचे पीक चांगलेच बहरलेले दिसुन आले.व शेतकरी पूर्णपणे पिक घेन्यात सक्षम राहिले. उन्हाळी बाजरीचे पीक चांगले होते, त्यामुळे शेतकर्यात आनंदाचे वातावरण दिसुन आले.
प्रतिक्रिया-मी पावसाळी हंगामात चार एक्कर बाजरीचे पेरणी केली होती व पिक चांगलेच आले होते परंतु ऑगस्ट सतत पाऊस पडल्याने मध्ये बाजरी काढन्यास सुरुवात झाली व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन फक्त चार कुंटल बाजरी झाली होती.मार्च मध्ये पुन्हा उन्हाळी बाजरीचे पीक घेतले व फक्त एकच एक्कर मध्ये 11 कुंटल बाजरी झाली.
Leave a comment