खूलताबाद । वार्ताहर
म्हैसमाळ येथे वनविभाग परिसरात अवैध दारू तयार करुन विक्री होत असल्याची माहिती वन विभागाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असता वन विभागपथकाने या अवैध दारूसाठ्यावर छापा मारुन दारूसाठा नष्ट केला. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ हे पर्यटनस्थळ असुन थंड हवेचे ठिकाण आसल्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची रेलचेल दिसुन येते परंतु कोरोना विषाणूने जो हमला मानवी जिवनावर करून मानवाला बंदिस्त करून टाकले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने जिवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त सर्वकाही व्यवहार ठप्प झाले आहे. संपूर्ण शहर आणि गांव सामसूम दिसत आहे. यात जे मद्यप्रेमी आहे. त्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. मद्याच्या आहारी गेलेले मद्यप्रेमी दारूच्या दुकानी बंद असल्यामुळे आता गावठी दारू कडे वळले आहे. या लॉकडाऊन मुळे गावठी अवैधरित्या मद्यनिर्मिती करून मद्यप्रेमींचि मद्याची भुख भागविण्यासाठी म्हैसमाळ येथील वनपरिक्षेत्राला दारूचा अड्डा बनवला आहे.
खुलताबाद तालूक्यातील म्हैसमाळ येथे वनविभाग परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारु तयार करुन ती विक्री होत असल्याची माहीती विश्वसनीय सुञाकडून वनविभाग ला मिळाली असता, त्यानुसार माहिती आधारे उपवनसंरक्षक औरंगाबाद सतीष वडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेञ यशपाल दिलपाक यांच्यासह पथकाने म्हैसमाळ येथील बालाजी मंदीर रोड, व आजूबाजूच्या परीसरातील जंगलात चालणार्या या गावठी दारु भट्यांनवर धाडी टाकून अंदाजे 1200(बाराशे) लिटर ड्रम मधे साठवलेले रसायन व बनवलेली अंदाजे 50 ते 60 लिटर गावठी दारु भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 नुसार नष्ट करुन कायदेशीर कारवाई करण्यात आली.या कारवाईत वनपाल कैलास जाधव,नंदू तगरे,वनरक्षक दिपक वाघ, प्रशांत निकाळजे, सोमीनाथ बरडे,व्ही.एल कुंठे यांनी कर्तव्य बजावले.
Leave a comment