औरंगाबाद । वार्ताहर
शहरात काही दिवसांपासून व परिसरात वार्डात गल्लीत कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यात लोक विविध सामना खरेदी साठी रस्त्यावर तुफान गर्दी करत आहेत.हि गर्दी कमी करण्यासाठी पोलीस व प्रशासनाच्या सम व विषम तारखेचा फॉरोमला केला पण आता तो पण फेल झाला की काय असे वाटत आहे सामना खरेदी वेळा वाढविल जेने करून लोकांना याचा फायदा होईल असे त्यांना वाटते पण याच्या झाले उलट लोक मोठ्या प्रमाणात सामनासाठी घरा बाहेर पडताना दिसत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी नाही तर शहरात कोरोना वाढविण्यासाठी हे लोक आपल्या जिवाशी खेळताना दिसत आहे आता तर पोलीस आणि प्रशासन सुद्धा या लोकांच्या समोर हात टेकले काही झाले तरी लोक घरात बसुन राहात नाही. सम-विषम तारखेच्या काही उपयोग नाही सम तारखेला कडकडीत बंद आणि विशम तारखेला सामान साठी तुफान गर्दी सकाळ पासून तर दुपार पर्यंत लोक रस्त्यावर फक्त पळापळ करताना दिसतात असे चित्र सध्या शहरात निर्माण झाली आहे या गर्दीत तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे आहे पण सामना खरेदीच्या नादात हे विसरून जात आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी
शहागंज, गुलमंडी, पैठणगेट, जवाहर कॉलनी, कुंभारवाडा, केली बाजार, रविवार बाजार रोड, बँक समोर सुद्धा पैसे काढण्यासाठी आज बँकमध्ये इंटरनेट, बॅकिग गुगल पे, फोन पे असताना सुद्धा लोक बँकसमोर रोज गर्दी करतात दिसत आहे.
पोलीस काय करता?
शहरात कोरोना वायरस मोठा प्रमाणात लागन होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी उभे असताना आपल्या दिसतात. विनाकारण फिरणार्या लोकांना अडुन त्या गाडीची पेपर तापसाताना दिसत आहे कोणाला हेल्मेट तर कोणाला लायसन्सची तपासणी करून पावती देताना दिसत आहे. आणि जे खरच अत्यंत आवश्यक कामासाठी बाहेर जायचे आहे त्यांची अडचण होत आहे अशी नागरिकांची चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता आठ्याच्या घरात गेली आहे. लोकांच्या मनात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तरी लोकांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यात मदत करावी.
Leave a comment