फर्दापूर पोलिसांची कारवाई
फर्दापूर । वार्ताहर
पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणार्या तिघांन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हि कारवाई साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे जमादार बाजीराव धनवट पो.कॉ ज्ञानेश्वर सरताळे, धनराज खाकरे, दिपक सोनवणे, रवींद्र सावळे यांच्या पथकाने जामठी (ता.सोयगाव) शिवारात बुधवारी सायंकाळी केली आहे.
लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर फर्दापूर पोलिसांचे पथक पोलिस ठाणे हद्दीत सतत गस्त घालतांना दिसत आहे दरम्यान दि.13 बुधवारी सायंकाळच्या सुमारास साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांच्या नेतृत्वात पोलिस पथक सावळदबारा,जामठी,रवळा-जवळा परीसरात गस्त घालीत असतांना जामठी शिवारातील जोरसिंग राठोड यांच्या शेतातील कडूलिंबाच्या झाडाखाली काही लोक पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून पोलिसांना प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला असता ईश्वर जोरसिंग राठोड व रामा जयराम जाधव (दोघे रा.जामठी ता.सोयगाव) यांना पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर पोलिसांची चाहूल लागल्याने खेमराज बाबू राठोड(रा.जामठी) हा झाडाझुडपाचा फायदा घेत पोलिसांना गुंगारा देवून घटनास्थळा वरुन फरार झाला.दरम्यान पैसे लावून जुगार खेळण्या प्रकरणी सदरील तिघांन विरूध्द फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a comment