सोयगाव । वार्ताहर
कोविड-19 कोणत्याही परिस्थितीत सोयगावला शिरकाव होऊ नये यासाठी जिल्हा पातळीवरून आता सोयगावकडे नजरा वळल्या आहेत.त्यामुळे दि.17 मे च्या टाळेबंद परिस्थितीचा अंदाज घेवून सोयगाव तालुक्यात पुढील उपाय योजनासाठी प्रशासन सतर्क करण्यात येईल.
संक्रमणाची संख्या हळूहळू ग्रामीण भागात पाय रोवत असल्याने जिल्हा प्रशासानावरून जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोविड-19 अद्यापही पोहचलेला नाही त्या तालुक्यांची मोठी काळजी घेण्याबाबत जिल्हा स्तरावरून योजना हाती घेण्यात येत आहे.तसेच तातडीने सोयगाव तालुक्यात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या इच्छुक ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतच्या हालचाली साध्या गतिमान करण्यात आल्या आहे.परंतु परजिल्ह्यातून व राज्यातून येणार्यांची संख्याही तितकीच वाढती असल्याने त्यांचेवर मेहेर नजर ठेवणार असल्याची माहिती मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले यांनी गुरुवारी सोयगावला पत्रकार परिषदेत दिली आहे. तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले यांनी सोयगाव तालुक्यातील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती कार्यालयाला त्यांनी आढावा बैठक घेतली गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, समाज कल्यान सभापती मोनाली राठोड यांनी सोयगाव तालुक्यातील उपाय योजनांचा आढावा दिला. या आढावा बैठकीत गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, समाज कल्यान सभापती मोनाली राठोड, विस्तार अधिकारी केवलसिंग पाटील, साहेबराव शेळके, बलराज पुरी, व्यंकटेश मामीलवाड, अभियंता नितीन वैद्य, उमेश पाटील, सुभाष जाधव, गजानन जोशी आदींची उपस्थिती होती.
जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले यांनी तातडीने जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विलीगीकरण कक्षाची पाहणी करून तातडीने उपाय योजनांच्या सूचना दिलाय यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी कोविड-19 चा आढावा सादर केला,तसेच जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांच्या बाबतीत चर्चा करून जरंडीला पदे भरण्याबाबत आश्वासन दिले.
Leave a comment