आष्टी । वार्ताहर
परतुर तालुक्यातील गोदापात्रातून अनेक ठिकाणी अनाधिकृत वाळू उपसा सुरूच आहे. सध्या लॉकडाऊनचा कार्यकाळ असल्याने सगळे प्रशासकीय अधिकारी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याच्या कामात गुंतलेले असताना या संधीचा फायदा वाळू माफीया घेत असून अवैध वाळू उपसा करत आहेत.
अनेक ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाळू काढण्यात येत आहे आष्टी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामाच्या नावा खाली अनधिकृत वाळूचा साठा केला असून ती वाळू 5 ते 6 हजार रुपये ट्रॅक्टर ट्रालीने विकली जात आहे याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे साध्यची परिस्थिती कोरोना मुळे पोलीस प्रशासन व्यस असल्याने वाळू माफिया बेशिस्तपणे वाळूचा उपसा करून अव्वाच्या सव्वा वाळू विक्री करत आहे तरी परतुरच्या तहसीलदार यांना याची गंभीर दखल घेऊन शासनाचा महसूल वाचवावा व योग्यती कार्यवाही करावी.
Leave a comment