आता रोज 20 शेतकर्यांच्या कापसाची होणार खरेदी
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव सीसीआय कापुस खरेदी केंद्रावर ता.13 बुधवार पासून 20 शेतकर्यांच्या कापसाची मोज-मापे होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कळविण्यात आले आहे. लॉकडाऊन मध्ये कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले होते परंतु शेतकर्यांची मागणी वाढल्यामुळे मध्ये सोशल डिस्टंनसिंगचे नियम पाळत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
सुरुवातीला दहा शेतकर्यांच्या कापसाची खरेदी केली जात होती परंतु दोन्ही तालुक्यातील एकूण 10004 दहा हजार चार शेतकर्यांनी नाव नोंदणी केली होती त्यापैकी अंबड तालुक्यातील 3857 तर घनसावंगी तालुक्यातील सहा हजार 6147 शेतकर्यांनी नाव नोंदणी केली होती यामध्ये नॉन एङ्ग ए क्यु कापसाची नोंद करण्यात आली होती नॉन एङ्ग ए क्यू कापूस सीसीआय खरेदी केंद्रावर घेतला जाणार नाही त्यामुळे यातील काही नावे कमी होतील नोंदणी केलेल्या शेतकर्यांच्या अंबड तालुक्यातील वेगळी सोय करण्यात येणार असल्याची हालचालींना वेग आला असून आंबड येथे लवकरच कापूस खरेदी केंद्र सुरू होणार असल्याचे कळाले आहे. नोंदणी केलेल्या घनसांगी तालुक्यातील 6147 शेतक-यांचे रोज 40 वाहने घेतली तर कापूस खरेदी लवकरच पूर्ण होईल लॉकडाऊन मध्ये आज पर्यंत सुरू झाल्यानंतर 98 शेतकर्यांच्या कापूस खरेदी करण्यात आला असून एकूण 2800 दोन हजार आठशे क्किंटलची कापुस खरेदी करण्यात आली आहे.
Leave a comment