पाचोड । वार्ताहर
पैठण तालुक्यातील देवगाव तांडा शिवारात नविन विहिरीचे खोदकाम करणारया मजुरांच्या अंगावर बुधवार (दि,13) रोजी दुपारी साडे तिन वाजेच्या सुमारास विज पडल्याने सहा जण जखमी झाले तर एक जण ठार झाला. देवगावतांडा येथील शेतकरी साहेबराव चव्हाण यांच्या ब्रम्हणगाव शिवारातील गट न 82 मधील शेतात नविन विहिरीचे खोदकाम सुरु आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारे सुटल्याने विहिरीवर काम करणारे मजुर बाजुला असलेल्या उभी असलेल्या बैलगाडीखाली बसले होते. त्या वेळीस त्यांच्या अंगावर विज कोसळल्याने साहेबराव भाऊराव चव्हाण वय 50वर्षे, राहणार देवगावतांडा यांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला तर सतिष जानु राठोड वय 25 वर्षे, अमोल तुळशीराम राठोड वय 27वर्षे, युवराज श्रीधर राठोड वय 30 वर्षे, जैतालाल प्रभु चव्हाण वय 23 वर्षे, नितेश पंढरीनाथ चव्हाण वय 25 वर्षे, निलेश सुभाष चव्हाण वय 20 वर्षे, सर्व राहणार एकतुनी तांडा (ता.पैठण) हे गंभीर रित्या जखमी झाले.या घटनेची माहिती पोलीस पाटील अनिल चव्हाण यांनी पाचोड पोलिसांना दिली, घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे,तात्यासाहेब गोपालघरे, आदींसह घटनास्थळी धाव घेतली व झालेल्या घटनेचा पंचनामा केला, जखमीवर आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर पुढिल उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे.
Leave a comment