सोयगाव । वार्ताहर
सोयगाव तालुक्यातील विविध भागात अडकलेल्या 16 परप्रांतीय मजुरांना बुधवारी दुपारी तहसील कार्यालयातून विशेष बसने मोफत राज्याच्या सीमेपर्यंत पाठविण्यात आले आहे.महसूल आणि परिवहन यांच्या संयुक्त मदतीने या परराज्यातील मजुरांना मध्यप्रदेशच्या सीमेजवळील इच्छापूर पर्यंत सोडण्यात आले आहे.पहिल्या यादीतील परराज्यातील 16 मजुरांना तहसीलदार यांनी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी निरोप दिला.
कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल 45 दिवसापासून परराज्यातील 16 मजूर तालुक्याच्या विविध भागात अडकले होते,जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रविण पांडे यांनी तातडीने तलाठ्यांना कामाला लावून अडकलेल्या मजुरांच्या याद्या मागवून या मजुरांची कोरोना तपासणी करून त्यांना बुधवारी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून निरोप देण्यात आला.यावेळी या मजुरांच्या चेहर्यावर मात्र आनंदाचे अश्रू दिसत होते,मध्यप्रदेशातील संबंधित नोडल अधिकारी या मजुरांना राज्याच्या सीमेवरून ताब्यात घेणार आहे अशी माहिती सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.यावेळी सोयगाव बस आगार प्रमुख हिरालाल ठाकरे,ए.डी.पायघन,नायब तहसीलदार मकसूद शेख,सुधीर जहागीरदार,शिपाई अनिल पवार,शिवाजी शेरे,ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप शिंदे आदींनी या मजुरांना निरोप दिला.
Leave a comment