निशुल्क त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी- दीक्षा पवार
औरंगाबाद । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील विविध भागात अडकून पडलेल्या स्थलांतरीत कामगार व विद्यार्थ्यांना बिनशर्त निशुल्क त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी, त्यांना घरी पाठविण्यासाठी जारी करण्यात आलेल्या नियम व अटी शिथिल करुन त्यांना प्रवासासाठी बसेस व रेल्वेच्या संख्येत वाढ करावी, अशा विविध मागण्या करीत राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष दीक्षा पवार बीड चे जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे वॉट्अपद्वारे निवेदन पाठवले आहे. करोना संकटाशी झुंजताना स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, विशेष लक्ष देण्यात येत नसल्याबद्दल, तसेच राज्याना आर्थिक अडचणीत ढकलण्यात येत असल्याच्या पाळण्यात आला असून विविध मागण्यांचे दिली. पहिल्यांदा अचानक लॉकडाऊन घोषणा करण्यात आलेल्या तीन आठवड्याच्या लॉकडाउनमुळे स्थलांतरितांचे विशेषत विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू झाले होते. त्याचवेळी चार ते पाच दिवसांची मुदत देऊन नंतर लॉकडाउन घोषित झाला असता, तर त्या काळात हे सर्वजण आपापल्या गावी पोहचू शकले असते. परंतु 21 दिवसांचा लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा लॉकडाउनची मुदत तीन मे पर्यंत व नंतर पुन्हा 17 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता या स्थलांतरीत कामगार व विद्यार्थ्यांसाठी सशर्त घरी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने घरी जाण्याची इच्छा असून देखील ते अडकून पडल्याने त्यांच्या घरी पोहचण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिस्थिीतीकडेही जिल्हाधिकारी लक्ष देऊन योग्य ते मदत करावी.
Leave a comment