औरंगाबाद-प्रतिनिधी
लोकनेते तथा माजी मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांची प्रेरणा घेऊन औरंगाबाद शहरातही तेली सेना व तेली समाजाच्या वतीने गरजू समाज बांधवांना घरपोच किराणा किट्स देऊन मदत करण्यात येत आहे. शहरातील विविध भागात जाऊन तेली सेनेचे कार्यकर्ते हे किट्स पोहोचवत आहेत.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या समाज बांधवांचे काम धंदे बंद पडले असून सध्या ते अनेक अडचणींचा सामना करीत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक भूमिकेतून तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार गणेश पवार यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना विनंती करून मदतीचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत अनेक दानशूर बांधव पुढे येत सहकार्य करत आहेत. यामध्ये कैलास सिदलंबे,कचरू वेळंजकर,सागर पाडस्वान,महेंद्र महाकाळ,विशाल नांदरकर,शिवा महाले,सुनिल क्षीरसागर,संतोष सुरूळे,विनोद मिसाळ,अनिल क्षीरसागर,कपिलदेव राऊत,योगेश थोरात,भगवान मिटकर,राजु मगर आदींच्या पुढाकारातून गरजू समाज बांधवांना किराणा किट्स देऊन मदत केली जात आहे, अशी माहिती गणेश पवार यांनी दिली आहे
                              
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
                              
Leave a comment