विमान प्रवास व कोविड चाचणीच्या खर्चाचा वाटा उचलणार

जालना । वार्ताहर

कोविड 19 साथीच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन व हवाई वाहतूक बंद झाल्याने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) अडकलेल्या हजारो भारतीयांच्या मदतीसाठी अल अदील समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दोन्ही देशांतील विमानसेवा नुकतीच पूर्ववत सुरू झाली आहे. विमानाच्या तिकिटाचे बुकिंग व मायदेशी परतू इच्छिणार्‍या भारतीयांची  कॉन्सुलेटकडे नाव नोंदणी हि सुरू आहे, मात्र लॉकडाऊनला तोंड देताना अनेक भारतीयांकडील पैसे संपून गेले आहेत. अशा गरजूंच्या तिकीट खर्चाचा तसेच त्यांच्या कोविड चाचणीच्या शुल्काचा वाटा डॉ. दातार उचलणार आहेत.  

परदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला पुढाकार संपूर्ण जगभरात अशा स्वरुपाचा सर्वांत मोठा व व्यापक उपक्रम आहे. कोविड साथीमुळे जगभर आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशांत शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय लॉकडाऊनमुळे तेथेच अडकून पडले आहेत. यात नोकर्‍या गमावलेल्या कामगारांचे प्रमाण ही मोठे आहे. हवाई वाहतूक बंद झाल्यामुळे या लोकांपुढील अडचणी आणखी वाढल्या होत्या. या स्थितीत आपल्या देशबांधवांना सामाजिक बांधीलकीच्या हेतूने सर्वतोपरी मदतीचा निश्‍चय संजय दातार व त्यांच्या समूहाने केला आहे. हे सहाय्य करताना आम्ही संबंधित यंत्रणांची मंजुरी घेऊनच समन्वय साधत आहोत आणि त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे ही कठोर पालन करत आहोत. यासंदर्भात संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे कॉन्सुलेट जनरल विपुल यांच्याशी चर्चा केली आहे. या भारतीयांना मायदेशी परतण्यात सहकार्य करणार्‍यासर्वांप्रती मी आभार व कृतज्ञता व्यक्त करतो. डॉ. दातार यांनी विविध संस्था व अनेक व्यक्तींना मदत करुन सामाजिक बांधीलकीही जपली आहे. भारतीय संस्कृतीचे आखाती देशांमध्ये संवर्धन करण्यात ते आघाडीवर आहेत. दुबईमध्ये मराठी उपक्रम राबवण्यास ते अधिकाधिक मदत करतात. त्यांना मुंबईत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्ङ्गे सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.