मंठा । वार्ताहर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देणारा शेतकरी शेतमजूर मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारा स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करायला लावणारा आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला आत्मनिर्भर बनवणारे असे आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज जाहीर केले असून खर्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला ग्लोबल बनवण्यासाठी या पॅकेजचा फायदा होईल हे जगातील सर्वात मोठे आतापर्यंतचे पॅकेज आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली. 200 कोटीचे पॅकेज जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सज्ज असावे असे सांगत जीडीपीच्या दहा टक्के रकमेचे पॅकेज यावेळी उपस्थित केले असून आलेल्या संकटाचे संधीत रुपांतर करण्यासाठी प्रत्येक भारतीय सज्ज असला पाहिजे असं देखील यावेळी लोणीकर यांनी म्हटले आहे आपल्या देशात अनेक गुणवत्ताधारक कुशल तरुण असून त्यांना या पॅकेजमुळे नव्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत लोणीकर यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक भारतीयाने आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे हे पंतप्रधान मोदींचे आवाहन खर्या अर्थाने तरुणांना रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देणार असून भारतीय तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात लघुउद्योग व कुटिर उद्योग गृह उद्योग याची उभारणी भारतामध्ये स्वदेशी उत्पादन तर वाढेलच पण त्याचबरोबर भारतीय तरुणांना रोजगार देखील मिळेल या पॅकेजमध्ये लघु उद्योग कुटीर उद्योग आणि गृह उद्योगाला चालना देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त उद्योगाची उभारणी करून स्वदेशी बरोबरच भारतीय तरुणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला पाहिजे असेही यावेळी स्पष्ट केले. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर छोटे उद्योजक या घटकांना प्राधान्य दिले जाणार असून या माध्यमातून स्वावलंबी भारताचे ध्येय पूर्णत्वाकडे जाणार आहे मध्यमवर्गीय कामगारांना उद्योगधंद्यासाठी या पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे भारतामध्ये असणार्या लोकर ब्रँडला ग्लोबल ब्रँड बनवण्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय तरुणांनी बघावं आणि या पॅकेजच्या माध्यमातून नक्कीच ते पूर्णत्वास जाईल अशी आशा आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येकाने भारतीय वस्तू खरेदी करण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार करण्याबाबत आवाहन देखील यावेळी आमदार लोणकर यांनी केलेला सामान्यपणे करणार्या करदात्यांसाठी देखील या पॅकेजमध्ये विशेष तरतूद असणारा हे जनधन आधार कार्ड आणि मोबाइलच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचल्या जाऊ शकते ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले असून 34 लाख संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा झाली आहे वीस कोटी महिलांच्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे मदत पोहोचली आहे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये थेट खात्यात जमा झाले असल्याची माहिती यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख कोटी रुपयाचे आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज जाहीर करून कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भारत हे सर्वाधिक सक्षम राष्ट्र असल्याचे सिद्ध केले आहे संपूर्ण जगभरात या पॅकेजचे कौतुक होत आहे असे देखील यावेळी आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजवर प्रतिक्रिया देताना आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले.
Leave a comment