जालना । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडावून असल्याने बंद केलेल्या रस्त्यावरून पास असतानाही पत्रकार दै.तात्कळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचा अरेरावी करून अपमान करून त्यांची गाडी अडवून जान्यास मज्जाव करत त्यांच्याशी अरेरावीची भाषा करणार्या पोलिस कर्मचार्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आज दि. 13 मे रोजी जिल्हा पोलीस उपअधिक्षक यांच्याकडे भरत मानकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केेली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर हे मंगळवारी पाच वाजता जालना रेल्वे स्थानकावर उत्तर प्रदेशाकडे जाणार्या मजुरांचे व इतर माहिती व वृत्तसंकलन करण्यासाठी गेले होते. त्यानंतर रेल्वे स्थानकावरून मस्तगड मार्गे कार्यालयाकडे सांयकाळी सहावाजेच्या सुमारास येत असताना रेल्वे स्थानक मार्गावरील मस्तगड येथे बंद करण्यात आलेल्या रस्त्यावर बंदोबस्तात असणारे बकल्ल क्रं. 09, 148 व इतर दोन कर्मचार्यांनी पास असतांना सुद्धा अडवणूक केली आहे. दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर हे चारचाकी गाडीमधून जात असताना यांना त्या कर्मचार्यांनी अडविले. हा रस्ता बंद आहे. दुसरीकडून जा असे सांगितले. तेव्हा आपण पत्रकार असून कार्यालयात जाण्यासाठी हाच रस्ता सोयीचा असल्याचे मानकर यांनी सांगितले. तसेच त्यांच्या जवळील जिल्हाधिकारी जालना यांनी दिलेली पास ही दाखविली. मात्र, तरीही त्यांच्याशी आरेरावी करून जाण्यास मज्जाव केला. मानकर यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी संपर्क करून ही बाब सांगितल्या नंतर त्यांना या रस्त्यावरून सोडण्यात आले. दरम्यान, मानकर यांच्याशी आरेरावी करणार्या पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे.
13
May
Leave a comment