सिल्लोड । वार्ताहर
सिल्लोड येथे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांना तालुका शिवसेनेच्यावतीने किरणा किट तसेच शाल देऊन सन्मान करण्यात आला. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती . प्रारंभी दिवंगत परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा राजश्री निकम, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, संचालक नरसिंग चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या तालूका प्रमुख रेखाताई वैष्णव, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हर्षल सरदेसाई, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहम्मद हनिफ, दिपाली भवर, दत्ता भवर , शेख युनुस, आदींची उपस्थिती होती. परिचारिकेचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान हे प्रशंसनीय आहे . कोरोना च्या लढाईत डॉक्टर, पोलीस यांच्यासह परिचारिका एक योद्धा म्हणून कर्तव्य बजावत आहेत. कोरोना महामारी च्या लढाईत परिचारिका आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत अशा शब्दात ना.अब्दुल सत्तार यांनी यावेळी परिचारिकेच्या कामाचा गौरव केला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका शीला सुरडकर ,निर्मला लांडगे, प्रतिभा कुलकर्णी, हेमा कोळी, मनिषा वाघ ,शीतल भागवत ,पूजा भालेराव, किसनी सरकुंडे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment