सिल्लोड । वार्ताहर
डॉक्टर आपल्या दारी हे अभियान सिल्लोड शहरात यशस्वी झाले असल्याने आता टप्पा दोन मध्ये सदरील अभियान आज बुधवार (दि.13) पासून सिल्लोड ग्रामीण मध्ये राबविण्यात येणार असून या अभियाना अंतर्गत कोरोना विषाणूच्या अनुषंगाने खबरदारी चा उपाय म्हणून सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील नागरिकांची थर्मल स्क्रीनींग करण्यात येणार आहे.याबाबत महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवार (दि.11) रोजी पूर्व तयारीची बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी ब्रिजश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे,पंचायत समितीच्या सभापती डॉ.कल्पना जामकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे,गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी रेखा भंडारे , पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, आदींची उपस्थिती होती. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सूचनेनुसार सिल्लोड शहरात कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने खबरदारी चा उपाय म्हणून तसेच सिल्लोड मतदार संघाला कोरोना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर आपल्या दारी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात डॉक्टरांनी घरोघरी जावून नागरिकांची थर्मल स्क्रीनींग केली. शहरातील अभियान यशस्वी झाल्याने आता टप्पा दोन मध्ये सिल्लोडच्या ग्रामीण भागात पंचायत समिती सिल्लोड, धन्वंतरी मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना (कोव्हीड -19) विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आपल्या दारी अभियानातून नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. सिल्लोड -सोयगाव मतदार संघामध्ये आज पर्यंत कोरोनाचा रुग्ण नाही. या अभियानाचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये, एक खबरदारी चा उपाय म्हणून तसेच भविष्यातील कोरोनाचे संकट रोखण्यासाठी व आपला मतदार संघ कोरोना पासुन सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियान अंतर्गत आपल्या गावात येणार्या डॉक्टर व त्याच्या कर्मचारी यांना सोशल डिस्टनसिंग चे पालन करून गावकर्यांनी सहकार्य करावे असे अवाहन राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
Leave a comment