शिवना । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील शिवना (वाडी) येथे असलेला अजिंठा-अंधारी पाणी प्रकल्पात मनोहर जानकीराम सपकाळ वय. 26 या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.10) रोजी दुपारी घडली.
मयत युवक व त्याचा भाऊ सुरेश दोघे शेतात चारा उचलण्यासाठी गेले होते, उन्हामुळे सकाळी शेतीचे कामे आटोपून दोघे भाऊ शेताच्या जवळचं असलेल्या अजंठा-अंधारी प्रकल्पात हात धुण्यासाठी गेले असता सुरेश सपकाळ याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. बघून त्याला वाचवण्यासाठी मनोहर सपकाळ याने पाण्यात उडी घेतली भावाला वाचवण्यात तर मनोहर यशस्वी झाला परंतु तो खोलवर जाऊन तो गळात फासला गेला. आणि यादरम्यानच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तर पाण्यात घसरुन पडलेला सपकाळ जखमी झाला आहे. घटनास्थळावर सुरू असलेला आरडाओरडा बघून तेथील शेतकर्यांनी त्याला बाहेर काढले .अजिंठा येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले व उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. मयत विवाहित असून घरातील कर्ता व्यक्ती होता. यापश्चात आई ,भाऊ,पत्नी व एक दीड वर्षाचा मुलगा आहे.
Leave a comment