माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांची राज्यपालांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्याकडे मागणी
जालना । वार्ताहर
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या राज्यातील किंवा राज्याबाहेरील नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेस मार्ङ्गत मोङ्गत घरी पोहोचवण्याची सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने माननीय पीठासीन अधिकारी विधिमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेली जालना जिल्ह्यासह परतूर विधानसभा मतदार संघात येऊ इच्छिणार्या नागरिकांची यादी महामहिम राज्यपाल श्रीमान भगतसिंह कोश्यारी जी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र ङ्गडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, विधिमंडळ पीठासीन अधिकारी, जिल्हाधिकारी (सर्व ), सर्व पोलीस अधिक्षक यांच्यासह सर्व जिल्हा आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना अडकलेल्या लोकांची यादी पाठवली आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार सदरील व्यक्तींना प्रमाणित करून थेट प्रवास करता येणार आहे त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यपालांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे सदरील यादीला तात्काळ मंजुरी देऊन तसेच सदरील यादी प्रमाणित करून तात्काळ एस.टी. महामंडळाच्या अधिकार्यांना पाठवावी अशी मागणी देखील या पत्राद्वारे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे मतदारसंघासह जिल्हाभरातील बाहेरगावी कामासाठी स्थलांतरित झालेल्या आणि परत गावी येऊ इच्छिणार्या नागरिकांची यादी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार बबनराव लोणीकर यांनी तयार केली असून सदरील लोकांना ई पास उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः लोणीकर प्रयत्नशील आहेत बहुतांश लोकांना ई पास उपलब्ध झाली असून त्यांना कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे याबाबतची सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापक यांनी त्यांच्या यंत्रणेमार्ङ्गत करावी अशी मागणी देखील यावेळी लोणीकर यांनी केली.
Leave a comment