अंगणवाडी इमारत पाडणे पडले महागात, सरपंच व दिरा विरुद्ध गुन्हा दाखल

भोकरदन । वार्ताहर

तालुक्यातील भोरखेडा येथील अनेक वर्षांपूर्वीची अंगणवाडीची इमारत असून ती पडण्याची कोणतीही  परवानगी न घेता सरपंच व त्याचा दीर यांनी  पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर रित्या पाडल्या प्रकरणी ग्रामसेविका रंजना गुलाबराव लांडगे यांच्या ङ्गिर्यादी वरून पारध पोलीस ठाण्यात  सरपंच उज्वला विजय सोनवणे व त्यांचा दिर मधुकर जयवंता सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील भोरखेडा ग्रामपंचायतच्या अंतर्गत 1981 ते 1992 सालापासून शासकीय अंगणवाडी इमारत असून त्याचा नमुना नंबर 8 नुसार नोंद देखील घेण्यात आली आहे सदर शासकीय इमारत मागील काही वर्षापासून पूर्वीची येथे अंगणवाडी भरण्यात येत होती. सदर ठिकाणी साखराबाई मन्साराम लाड ह्या अंगणवाडी सेविका म्हणून मागील बर्‍याच वर्षापासून कार्यरत आहेत भोरखेडा गावातील अंगणवाडीची इमारत मागील काही महिन्यापूर्वी भोरखेड्याच्या सरपंच सौ उज्वला विजय सोनवणे यांनी कोणत्याही प्रकारे नियमानुसार परवानगी न घेता आपल्या सरपंच पदाचा गैरवापर करून त्यांचे दीर मधुकर जयवंता सोनवणे यांनी सदर शासकीय इमारत पाडली आहे. याबाबतीत माजी सरपंच शांताबाई सुभाषराव सोनवणे गावातील वीस-पंचवीस गावकर्‍यांनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने भोकरदन पंचायत समितीचे विस्तारधिकारी यांनी चौकशी केली याबाबत पाडलेल्या इमारतीचा पंचनामा केला त्यावेळी गावातील पंच प्रल्हाद अण्णा सोनवणे विठ्ठल पवार रामदास कुंडलिक सोनवणे यांच्यासमक्ष हा पंचनाम्यात कोणतेही वरिष्ठांची परवानगी न घेता पदाचा गैरवापर करून शासकीय इमारत पाडल्याचे निष्पन्न झाले याबाबत प्रकल्प अधिकारी कनिष्ठ. अभियंता पंचायत. समिती बांधकाम जिल्हा उप-विभाग भोकरदन यांनी चौकशी केली असता सरपंच उज्वला विजय सोनवणे अंगणवाडीची शासकीय इमारत पाडून तिचे साहित्य पत्रे विटा खिडक्या लोखंडी अँगलचा अपहार केला आहे. भोकरदन पंचायत समितीने सरपंच व ग्रामपंचायत कार्यालय यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला होता परंतु सरपंच यांनी मुदतीत खुलासा सादर केलेला नाही त्यामुळे गटविकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती भोकरदन यांचे पण पत्र संदर्भ जावक क्रमांक 32010/19 कार्यालय पंचायत समिती भोकरदन यांनी ग्रामसेविका रंजना गुलाबराव लांडगे यांना दिनांक 26.2. 2020 रोजी गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी आदेश देण्यात आले होते त्यांनुसार पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.