कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सतत दोन दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. लॉकडांच्या काळात जीवनावश्यक सेवा देणार्या सर्वांनीच रात्र दिवस सातत्याने सेवा देण्याचे काम केले.
मोठ्या बाजारपेठेत अनेक प्रश्न निर्मान होतात. गेल्या दोन महिण्यापासुन 15 हजार लोकसंख्येच्या गावात अत्यावश्यक सेवा देणार्यां सर्वांचेच मानावे तेवढी आभार कमीच आहेत कुंभार पिंपळगाव व परिसरात तारीख 10 रविवार रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसाने विजेचे खांब पडल्याने दोन दिवसापासून कुंभार पिंपळगाव सह परिसरातील 30 40 गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने दळण व पिण्याच्या पाण्यासह अनेक प्रश्ननामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गावात काही वाटर ङ्गिल्टर प्लांट धारकांनी वेळीच गंभीरता दखल घेऊन विहिरीचे टँकरद्वारे पाणी आणून ङ्गिल्टर प्लांट वर पाणीपुरवठा जनरेटर च्या साह्याने केला व डिझेलवर चालणार्या जनरेटेरने गावातील नागरिकांसाठी ङ्गिल्टर प्लांट वर पाणी देण्याची काम करण्यात आले येथील काही प्लांट धारकांनी रात्रंदिवस संपूर्ण गावाला ङ्गिल्टर पाणी पुरवठा केला आहे .
Leave a comment