आ.प्रशांत बंब यांच्या अचानक भेटीदरम्यान मुख्यालयी गैरहजर होते तलाठी
खुलताबाद । वार्ताहर
संपूर्ण देशात शासन-प्रशासन व नागरिक कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नांची पराककरत असताना ग्रामीण भागातील खेड्यांची जबाबदारी असलेले जबाबदार कर्मचारी मात्र गावांना वार्यावर सोडून गेल्या गत दोन महिन्यांपासून गायब झाले आहेत.
लोकप्रतिनिधी व गावकर्यांनी ओरड केल्यानंतर या कर्मचार्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचार्यांना गावातच मुख्यालयी थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करत हे सर्व मागील दोन महिन्यांपासून गायब आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी ओरड केल्यानंतर ग्रामस्थांना दमदाटी करीत गप्प करून पुन्हा गायब होतात.लोकप्रतिनिधींनी तालुक्याचा दौरा केला असता जबाबदार कर्मचारी गायब असल्याची तक्रार ग्रामस्थांनी त्यांच्याकडे केली. ही बाब तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अशा कर्मचार्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. महसूल विभागाचे तलाठी प्रभाकर चव्हाण (बाजार सावंगी), लक्ष्मण जाधव (पाडळी), सायली विटेकर (वडोद), ए.बी. दांडगे (भडजी), तुकाराम सपकाळ (बोडखा), के.टी. कुबेर (टाकळी) या तलाठ्यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आपणा विरुद्ध कारवाई का करू नये, अशा स्वरूपाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेषम्हणजे या सहा तलाठ्यांना तहसीलदार राहुल गायकवाड यांनी 24 तासांच्या खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान,आ.प्रशांत बंब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद तालुक्यातील गदाना, सुलतानपूर, कनकशिळ, कानडगाव, बाजारसावंगी आदी गावात जाऊन रेशन दुकानाला भेटी देऊन तेथील नागरिकांना धान्य गहू, तांदूळ बरोबर मिळतो की नाही याबाबत चौकशी केली.तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे दररोज गावात हजर राहतात की नाही याबाबत गावकर्यांशी विचारपूस केली. गदाना व बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन डॉक्टर व कर्मचारी हजर राहतात का नाही याची कसुन चौकशी करुन जे कर्मचारी गैरहजर आढळले त्यांची तक्रार तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
Leave a comment