भराडी । वार्ताहर
कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी सेवा देणार्या सिल्लोड येथील उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी पीपीई कीटचे वाटप करण्यात आले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्फत आधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट देण्यात आले.सद्या औरंगाबाद शहरात व आसपासच्या भागात कोरोनाने शिरकाव केला असून संभाव्य खबरदारीचा उपाय म्हणून उपजिल्हा रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रशासन सतर्क झाले आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वतीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट रुग्णालय अधीक्षक डॉ अमित सरदेसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रेखा भंडारे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले, यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर,भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, सिद्धेश्वरचे चेअरमन इद्रीस मुलतानी, तहसीलदार रामेश्वर गोरे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर, माजी उपनगराध्यक्ष किरण पवार, आदी उपस्थित होते, कोरोनाचा वाढता प्रादुभाव आणि त्यामूळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण यातून सावरण्यासाठी व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक साहित्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्फत वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रशासकिय व आरोग्य यंत्रणेला समाजाने सहकार्य करुन योग्य नियमांचे पालन करणे ही आवश्यक आहे.
Leave a comment