स्थानिक गुन्हे शाखा आणि खुलताबाद पोलिसांची संयुक्त कारवाई
खुलताबाद । वार्ताहर
सध्या महाराष्ट्र तसेच देशात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने तंबाखु, तंबाखुजन्य पदार्थ, सिगारेट तसेच देशी विदेशी दारुचे सेवन करणे तसेच खरेदी विक्री करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. अशात मौजे तलाववाडी ता.खुलताबाद येथे दोन ईसम हे आप आपल्या घरात गुंगीकारक पदार्थ गांजा ताब्यात बाळगुन त्याची चोरटी मार्गाने सर्रास विक्री करीत असल्याची माहिती खबर्याने स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीण यांना दिली त्यावरुन मा.पोलीस अधीक्षक श्री.मोक्षदा पाटील यांनी स्थागुशाला तात्काळ छापा टाकणे बाबत आदेशीत केले. स्थागुशा कडुन कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान अचानक त्या ईसमांच्या घरी धाड टाकुन कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
दिनांक 11/05/2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की,मौजे तलाववाडी गावातील ईसम नामे 1)जयसिंग मानसिंग गुमलाडु व 2)प्रेमसिंग शामसिंग गुमलाडु हे आप आपल्या ताब्यात गांजा बाळगुन सर्रास त्याची विक्री करीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने स्थागुशाचे पथकाने खुलताबाद पोलीस स्टेशन येथे येऊन वरील प्रमाणे माहिती पो.नि.सीताराम मेहत्रे यांना दिली व त्यांचेही पथक मदतकामी सोबत घेऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी अचानक छापा टाकला असता वरील दोन्ही ईसमांच्या ताब्यात अनुक्रमे 2 किलो 265 ग्रॅम किंमती 24915/- व एक मोबाईल किंमती 1000/- व 2 किलो 580 ग्रॅम किंमती 28,380/- असा एकूण 4 किलो 845 ग्रॅम गांजा असा एकुण 54,295/-रु.चा माल मिळुन आल्याने त्यांना मिळालेल्या मालासह ताब्यात घेऊन पो.ठाणे खुलताबाद येथे कायदेशिर कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.मोक्षदा पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.गणेश गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शास्त्रेचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत कुंदे, पोउपनि संदीप सोळंके,पोह.नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख ,पोना शेख नदीम तसेच पो.ठाणे खुलताबादचे पोनि श्री.सीताराम मेहत्रे, सपोनि पंकज उदावंत, पोह जगन्नाथ बळी, पोना सुनिल लहाने, निळकंठ देवरे भावसिंग जारवाल यांनी संयुक्तरित्या केली आहे.
Leave a comment