भराडी । वार्ताहर
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भराडी परिसरातील पंधरा गावातील शेतक-यांचा व नागरिकांचा आर्थिक व्यवहार करण्यासाठी संपर्क येतो. यावेळी शासनाच्या वतीने कोरोणा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पि एम किसान योजनेअंतर्गत शेतक-यांच्या खात्यावर दोन हजार रूपये जमा करणे चालु असतांनाच सदरील बँकेत श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याचे पैसे जमा होत असल्याच्या अफवेने शेतक-याबरोबर इतर लाभार्थ्याचीही बँकेत पैसे काढण्यासाठी व बॅलेंन्स चेक करण्यासाठी गर्दी होत होती.बँकेत पुरेशे बॅक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे बॅकेचे शाखाधिकारी जंगले यांच्याकडून पोलिसांना सांगण्यात येत होते त्यामुळे संचारबंदीच्या काळात भराडी बिट जमादारावर बारा गावाचा कारभार असतांना त्यात बँकेतील नागरिकांच्या गर्दीची भर पडली होती.
बॅकेत आलेले पैसे काढण्यासाठी व पैसे भरणा करण्यासाठी शेतकरी वर्ग तसेच वृध्द महिला,पुरुष यांची बॅकेत गर्दी होत हीती. गर्दी कमी करण्यासाठी त्यांना हाकलुन लावण्यासाठी लाठीचा वापर करणे योग्य नसल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भराडी बिट जमादार विठ्ठल चव्हाण व पोलीस कर्मचारी संदीप कोथलकर यांनी बँकेत शाखाधिकारी जंगले यांना बँकेतील पंधरा गावांना आठवड्यातील सहा दिवसांमध्ये विभागणी करण्याचे सांगितले.सदरील शाखाधिकारी जंगले यांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन करून सोमवार व गुरूवार रोजी भराडी,वांजोळा,सिसारखेडा, कासोद,धामणी, मंगळवार व शुक्रवार रोजी धानोरा,वांगी बुद्रुक,वांगी खुर्द,उपळी,तळणी तसेच बुधवार व शनिवार रोजी वडोद चाथा,वडाळा,पिरोळा,डोईफोडा,दि
Leave a comment