जालना । वार्ताहर
राज्य राखीव बलगट क्र. 3 येथील एका जवानाच्या स्वॅबचा तसेच आनंदनगर, नुतन वसाहत परिसरात राहणार्या व जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेच्या स्वॅबचा अहवाल आज दि. 11 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असुन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सहवासितांची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे. दि. 10 मे रोजी रंगनाथनगर, पाण्याची टाकी परिसर, जालना येथील महिला कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्ङ्गत खबरदारीची उपाययोजना म्हणुन पाच तालुकास्तरीय आरोग्य पथकाने परिसरातील 124 कुटूंबातील 699 नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले.
या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील 3 हायरिस्क तसेच कानडगाव ता. अंबड येथील दोन कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील पाच हायरिस्क व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. जिल्ह्यात एकुण 1376 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 31 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 810 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 78 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1222 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 13 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1127, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 240, एकुण प्रलंबित नमुने-78 तर एकुण 779 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 24, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 595 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 01, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -283, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 31, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 02, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 268 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत उत्तरप्रदेश-4140,बिहार-2681,
Leave a comment