लॉकडाऊन मध्ये नागरिकांचे हाल रमजानचा महिना सुरू असतानाही विजवितरणचा हलगर्जीपणा
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसांगी तालुक्यातील मोठे बाजारपेठेची कुंभार पिंपळगाव येथे गेल्या चोवीस तासात पासून विज गायप झाली आहे. ता.10 रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता वादळी वार्याने विजेचे खांब पडले होते. त्यामुळे रात्रभर 38 गावे अंधारात होते सोमवारी कुठलीही प्रकारची वीज वितरण व गुत्तेदार हालचाल न केल्याने 24 तासानंतरही लाईट आली नाही.
नागरिकांना दुसरी रात्र ही अंधारात काढावी लागत आहे. रमजानचा महिना सुरू आहे आधीच कोरोनाच्या संकटाने नागरिक त्रस्त असताना घरात राहणे मुश्कील झाले.पाण्याचा प्रश्न निर्मान झाला आहे.लाईट नसल्याने लहान मुले व वयोवृध्दांना उन्हाळ्याचे दिवस असल्याने गर्मीचा अति त्रास होत आहे अस्थामा असलेल्या वयोवृध्दाना उष्माघाताने मृत्यू होऊ शकतो या वीज वितरण जबाबदार राहील यापूर्वी कुंभार पिंपळगाव साठी परतुरहून लाईटची संकटकाळी सुविधा होती ही सुविधा ही काही ही दिवसापासून बंद आहे कुंभार पिंपळगाव परिसरातील लाईट गेल्यास इमर्जन्सी अति संकटकाळात परतूर येथून लाईट पुरवठा होत होता परंतु याही लाईटचे पाटोदा येथे विजेचे खांब पडले असून अनेक दिवसांपासून तीही दुरुस्ती केली नाही .यातही विजय वितरनचा हालगर्जीपना दिसून येत आहे. त्यामुळे अशा इमर्जन्सी लाईट परतुरवरूनही घेता येत नाही तीही सुरू करण्यात यावी व वीज वितरण यांनी तात्काळ लक्ष घालून लाईट दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी 38 गावातील त्रस्त नागरिकांमधून होत आहे.
Leave a comment