शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी शेतकर्यांची मागणी
कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून केले पंचनामे
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, नागोबाची वाडी, जांब समर्थ, विरगव्हाण, घाणेगाव, गुंज, मूर्ती, लिंबी, धामणगाव, मासेगाव आरगडे गव्हाण आदि गावात ता.6 शनिवार रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वार्यासह अवकाळी पावसाने, पंपई, केळी आदि पिकांचे प्रचंड नुकसान झाले .केळीला 60 हजार रुपये एकरी खर्च केलेल्या केळीचे पिकांचे मोठे नुकसान झाले. तीन लाख रुपये एकरी उत्तपन्न बुडाले शासनाने एकरी 3 तिनं लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांना मधून होत आहे .मागील वर्षी तोंडाला आलेला घास पाण्यामुळे गेला या वर्षी आसमानी संकटाने तोंडाला आलेला घास हिरावला आहे शेतकर्यांचे हाल होत आहे.
गावातील घरावरील पत्रे उडाली घरातील शेती ठेवलेल्या शेतीमाल भिजला मालांचे नुकसान झाले.आनेक शेतकर्यांच्या सध्या कांदा काढणी सुरू असल्याने क कांदा पिकाचेही नुकसान झाले बाजरी टरबूज,बाजरी आदि पिकांची नुकसान झाले असून सुसाट वार्यामुळे गावातील झाडे उन्मळून पडली त्यामुळे विजेचे खांब खाली पडल्याने लईट बंद झाल्याने रात्रभर गावात अंधार होता कोंबड्या-बकर्या यांनाही विजा पोहोचली तर शेतकर्यांची शेतातील अवजारांची ही मोठे नुकसान झाले परिसरातील प्रशासनाने याची नोंद घेऊन तलाठी ग्रामसेवक कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी व केळी पिकांची नुकसानग्रस्त शेतकर्यांना शेतकरी मागणी केली आहे येथील ज्ञानेश्वर उङ्गाड, हरिप्रसाद कंटुले, आबासाहेब कंटुले आदी सह शेतकर्यांनी मागणी केली होती तात्तकाळ कृषी विभागाने दखल घेऊन आयुक्तांच्या आदेशा नुसार शेतकर्यांच्या केळी पिकाची कृषी सहाय्यक एस बी सोनवणे यांनी पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत.
Leave a comment